लोकराज्यचे संतोष बिसुरे यांचे गडहिंग्लज येथे जनसंवाद अभियान
लोकराज्यचे संतोष बिसुरे यांच्या गडहिंग्लज येथील जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.
लोकराज्य जनता पार्टीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री.संतोष गणपती बिसुरे यांनी गडहिंग्लज तालुक्यात जनसंवाद अभियान राबविले . या अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गडहिंग्लज शहर, मुत्नाळ, नेसरी, हरळी आदी भागातील जनसंवाद अभियानास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. लोकांचे प्रश्न घेऊन गेली अनेक वर्षे मी लोकांच्या सेवेसाठी कार्य करीत आहे. आपण एका सामान्य कार्यकर्त्यास लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन उमेदवार संतोष बिसुरे यांनी केले. या जनसंवाद अभियानास संबोधित करताना लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लोकराज्य जनता पार्टी काम करीत आहे. सामान्य जनतेने पक्ष बदलू नेत्यांना बाजूला करून तुमची दुःखे समजून घेणारे लोकराज्य जनता पार्टीचे उमेदवार संतोष बिसुरे यांना साथ द्यावी असे आवाहन केले. या अभियानात लोकराज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर डोनोलीकर,अमृत चव्हाण,रेखा सांगलीकर, विकास कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment