Posts

लोकराज्यचे संतोष बिसुरे यांचे गडहिंग्लज येथे जनसंवाद अभियान

Image
 लोकराज्यचे संतोष बिसुरे यांच्या गडहिंग्लज येथील जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकराज्य जनता पार्टीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री.संतोष गणपती बिसुरे यांनी गडहिंग्लज  तालुक्यात जनसंवाद अभियान राबविले . या अभियानास जनतेचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गडहिंग्लज शहर, मुत्नाळ, नेसरी, हरळी आदी भागातील जनसंवाद अभियानास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. लोकांचे प्रश्न घेऊन गेली अनेक वर्षे मी लोकांच्या सेवेसाठी कार्य करीत आहे. आपण एका सामान्य कार्यकर्त्यास लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन उमेदवार संतोष बिसुरे यांनी केले. या जनसंवाद अभियानास संबोधित करताना लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लोकराज्य जनता पार्टी काम करीत आहे. सामान्य जनतेने पक्ष बदलू नेत्यांना बाजूला करून तुमची दुःखे समजून घेणारे लोकराज्य जनता पार्टीचे उमेदवार संतोष बिसुरे यांना साथ द्यावी असे आवाहन केले. या अभियानात लोकराज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर डोनोल...

मानवी जीवन:-

Image
  मानवी जीवन :-  मानवी जीवन हे अनेक चढउतारांनी भरलेले आहे. जन्मापासून सातत्याने माणूस नवनवीन गोष्टी शिकत असतो. नवीन शिकण्याची इच्छा ज्याच्या जवळ आहे तो यशस्वी जीवन जगू शकतो. या पृथ्वीतलावर करोडो माणसे वावरत आहेत . पण भविष्याचा वेध घेऊन, सकारात्मक  दृष्टिकोन ठेवून नव्या उमेदीने उच्च ध्येय उराशी बाळगून जे काम करतात तेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. सातत्याने प्रयत्न, कष्ट व सकारात्मक विचार मानवाला सुख- समाधान- यश- आनंद व चांगले आरोग्य मिळवून देत असतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो. *'जशी दृष्टी तशी सृष्टी'* याचा विचार केल्यास जसे आपण एखाद्या घटनेकडे पाहतो तशा पद्धतीनेच ते दृश्य आपल्याला दिसत असते. संकटे ही येतच असतात. पण संकटाकडे संधीच्या दृष्टीने पाहिल्यास आपल्याला त्या संकटावर मात करता येते. सुख आणि दुःख या मानवी जीवनातील दोन बाजू आहेत. दोन मित्र समोरासमोर बसलेले आहेत. दोघांच्याही समोर दोन  पेले थंड पेयाने अर्धे -अर्धे भरलेले आहेत . एक मित्र अर्धा पेल्याकडे आनंदाने पाहतो तर दुसरा मित्र मला अर्धाच पेला मिळाला म्हणून दुःख व्यक्त करतो...